spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंकडून बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु

शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतले.

शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतले. नुकताच शिंदे-फडणवीस सरकारकडून आणखी एक निर्णय हा घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठं गिफ्ट दिलं आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरं देण्यात येणार आहेत. यापूर्वी पोलिसांच्या घरांच्या किमतीवरुन ठाकरे सरकारवर तत्कालिन विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली होती. बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखात घर मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली होती. तर आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना दिली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारने DG लोन (DG loan) ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

DG लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक अतिशय महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज २० लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिले जाते. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. DG लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार आता पोलिसांना २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना १५ लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा :- 

सूर्यकुमारच्या षटकारांच्या फटकेबाजीवर विराटने केला सलाम 

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या घरी बाप्पाचे आगमन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss