spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी नाश्त्यासाठी बनवा उत्तपम सॅंडविच

सकाळच्या वेळेस नाश्ता केल्याने पोट भरलेले राहते.

सकाळच्या वेळेस नाश्ता केल्याने पोट भरलेले राहते. तसेच अनेकांना नाश्त्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायला आवडतात. आपण नाश्त्यामध्ये नेहमीच पोहे, उपमा, इडली इत्यादी पदार्थ खातो. पण अनेकदा तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. जर तुम्ही रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर तुम्ही काहीतरी वेगळे ट्राय करू शकता. तर तुम्ही नाश्तामध्ये उत्तपमचे सॅंडविच नक्की बनवू शकतात. हे सँडविच बनवण्यासाठी हे अगदी सोपं आहे. कमी साहित्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. जर तुम्ही हे सँडविच कधी खाल्ले नसेल तर हे नक्की बनवून पाहा.

साहित्य:-

२ कांदे,२ कप डोसा बॅटर, शिमला मिरची २, २ टोमॅटो, २ चमचे पालकची प्युरी, ३-४ हिरव्या मिरच्या, चीज, हिरवी चटणी, मीठ

कृती:-

सर्वप्रथम उत्तपम सँडविच बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर फे सर्व बारीक चिरून घ्या. बारीक चिरून झाल्यानंतर ते नीट मिक्स करून घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात डोसा पीठ, पालक प्युरी आणि मीठ घालून एकत्रितपणे मिक्स करून घ्या. नंतर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर, उत्तपम बनवून त्यावर चिरलेल्या भाज्यांचे मिश्रण पसरवून घ्या. उत्तपम दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.त्यानंतर एका उत्पम वर हिरवी चटणी लावून घ्या. जर त्यावर तुम्हाला चीझ हवे असल्याचे तुम्ही ते घालू शकता. नंतर त्यावर टोमॅटो सॉस घाला आणि या उत्तपमवर दुसरे उत्तपम ठेवा. तयार आहे उत्तपम सँडविच.

हे ही वाचा: 

Abhishek Ghosalkar आणि Morris Noronha प्रकरणाबाबत उदय सामंत यांचा गंभीर आरोप | Abhishek Ghosalkar

एकाच वेळी तीन व्यक्तींना भारत सरकारने जाहीर केला भारतरत्न पुरस्कार, चौधरी चरणसिंह, नरसिंह राव ,स्वामीनाथन यांना भारतरत्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss