spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दीड दिवसांच्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण

काल सर्वत्र गणपती बाप्पाचे (ganesh chaturthi )आगमन झाले आणि आज दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.

काल सर्वत्र गणपती बाप्पाचे (ganesh chaturthi )आगमन झाले आणि आज दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार वाजल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात होईल. कोरोना महमरीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.

मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीव रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. यासाठी मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदान येथे मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. यंदा येथील दोन कृत्रिम तलाव हे शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यासोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन व्हावं यासाठी अमोनियम नायट्रेटचा (Ammonium nitrate) प्रयोग याठिकाणी करण्यात आला आहे.

 

Latest Posts

Don't Miss