spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आळंदीमधील इंद्रायणी नदीवरील प्रदूषणावर तात्काळ कारवाई होणार;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आरोप

पुण्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मागील काही दिवसांपासून प्रदूषित झाली आहे.

पुण्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मागील काही दिवसांपासून प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंद्रायणी नदी सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणांवर आता उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आळंदीकरांची इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौऱ्यावर आहेत. आज फडणवीसांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण होणार आहे.

मागील काही महिन्यांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. या नदीच्या प्रदूषणावर अनेक नागरिकांनी सरकार दरबारी अनेक प्रश्न मांडलेया आहेत. पण यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. ही नदी मोठ्या प्रमाणावर फेसाळलेली दिसत आहे. दर्शनासाठी येणारे हजारो नागरिक आपला जीव धोक्यात घालून नदीमध्ये जात आहेत. आळंदीमध्ये आषाढी वारी, कार्तिकी एकादशी या दिवशी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळेस सर्व भक्त इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून तेच पाणी तीर्थ म्हणून पितात. पण नदी दूषित झाल्यामुळे वारकरी आणि स्थानिकांना अनेक आजार जडत आहेत. मागील सात वर्षांपासून इंद्रायणी नदीची हीच अवस्था झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकतक्रारी करण्यात आल्या आहेत तरीही नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडले जात आहे. दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र तरीसुद्धा हे प्रदूषण कमी न झाल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी तिथे वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण केले आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमावेळी केली आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला आनंद होतो. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss