spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘शिवा’ मालिकेनं केली प्रेक्षकांची नाराजी, ठरलेल्या वेळी मालिकाचं प्रसारण लांबवलं

छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन विषयांवर आधारित मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन विषयांवर आधारित मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. झी मराठीवर गेले काही दिवस शिवा आणि पारु या दोन मालिकांचे प्रोमो सतत दाखवले जात होते. प्रोमो पाहिल्यापासून या व्यक्तिरेखापासून प्रेक्षकांना या दोन मालिकांची उत्सुकता लागली होती.’झी मराठी’ने १२ फेब्रुवारी रोजी दोन नव्या मालिका सुरू करण्याची घोषणा केली. या दोन नव्या मालिकांची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. मात्र, पहिल्याच दिवशी ‘झी मराठी’कडून चूक झाली. त्यावर प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनीची खिल्ली ही उडवली आहे.

‘झी मराठी’वर ‘पारो’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ७.३०  वाजता ‘पारो’ ही मालिका प्रसारीत झाली. ‘पारो’च्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी दाद दिली.या नव्या मालिकेच्या पहिल्या  एपिसोडनंतर प्रेक्षकांना दुसऱ्या मालिकेची प्रतिक्षा होती. ‘शिवा’ ही दुसरी मालिका रात्री ९ वाजता प्रसारीत होणार होती. अनेकांना या मालिकेची उत्सुकता होती.मात्र, या मालिकेची प्रतिक्षा असणाऱ्या प्रेक्षकांची चांगलीच नाराजी झाली.

७.३० वाजता ‘पारो’ ही मालिका प्रसारीत झाली.मात्र ९ वाजता शिवा ही मालिका न लागता पुन्हा एकदा पारो मालिकेचेच   प्रक्षेपित झाला. ‘झी मराठी’कडून झालेल्या या ब्लंडरवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकानी कमेंट्स करत हिणवलं देखील आहे.

काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर या ‘शिवा’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शिवा या मालिकेचा कंटेन्ट वेगळा असल्यामुळे प्रेक्षक फारच उत्सुक होते. पण ती टेलिकास्ट न झाल्यामुळे सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटत आहे. मालिकेत शिवा ही मुलगा नसून मुलगी आहे. शिवाची भूमिका अभिनेत्री पूर्वा फडके साकारणार आहे. पूर्वाने याआधी कलर्स वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता प्रेक्षक शिवा मालिकेतून पूर्वाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उस्तुक आहेत.दरम्यान आता शिवा मालिका कधी प्रक्षेपित होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

हे ही वाचा: 

भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर Ashok Chavan यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्राजक्ता माळी झळकणार ‘भिशी मित्र मंडळ’ या आगामी चित्रपटात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss