spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनुपमा मालिकेतील अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे वयाच्या ५९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री निधन झाले.

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली.छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे वयाच्या ५९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री निधन झाले.मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या अचानक एक्झिटमुळे टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.तसेच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली देखील वाहिली आहे,

अभिनेते ऋतुराज सिंह यांनी ‘अनुपमा’ मालिकेत काम केले होते.   तसेच 90 च्या दशकात ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शो त्यांनी होस्ट केला होता.आणि तेव्हापासून त्यांनी आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते. ऋतुराज सिंह यांनी अनेक गाजेलल्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ऋतुराज सिंह हे होगी अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, आहट आणि अदालत, दीया और बाती हम ,वॉरियर हाय’, ‘लाडो 2’अशा मालिकांमध्ये झळकले होते.

ऋतुराज सिंह यांचं पूर्ण नाव ऋतुराज सिंह चंद्रावत सिसोदिया असं होतं. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये कोटा इथं सिसोदिया राजपूत कुटूंबात झाला. ऋतुराज सिंह यांनी त्यांचं शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. त्यानंतर १९९३मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे, मालिका केल्या. राजनीती, बद्रीनाथ की दुल्हनिया अशा बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

ऋतुराज सिंह यांनी ‘अनुपमा’ या मालिकेत साकारलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. अनुपमा मालिकेतील त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेचे कौतुक करण्यात आले.तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता’मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर अनेक चाहते अश्रूंच्या डोळ्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे निधन झाले आहे.

हे ही वाचा: 

५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचे असेल तर वेगळा कायदा का? छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न

Time Maharashtra आयोजित stawberry with cm कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचगणी येथे संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss