छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत असतात. आता टेलिव्हिजनवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याचं पसंतीस उतरत असतात.अशातच आता मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिची आगामी ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहेत.रेश्मा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.रंग माझा वेगळा मालिकेत रेश्माची दीपा ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.दरम्यान आता रेश्माला प्रेक्षक पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उस्तुक आहेत.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचे एकापाठोपाठ एक असे तीन प्रोमो प्रेक्षकांसमोर आले आहेत. या प्रोमोंना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत मलिकेतील इतर कलाकारांचे चेहरेही दाखवण्यात आले आहेत. या मालिकेत बालकलाकार आरोही सांबरे ही रेश्माच्या म्हणजेच जानकी रणदिवे हिच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये खलनायिकेचे चेहरा दाखवण्यात आला आहे.मालिका म्हंटलं तर कारस्थानं करण्यासाठी खलनायिका तर हवीचं.त्याशिवाय मालिका रंगत नाही.तर ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील प्रतीक्षा मुणगेकर खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत प्रतीक्षा ही जानकीच्या जावेच्या भूमिकेत दिसणार आहे.असं मालिकेच्या प्रोमोवरुन स्पष्ट होत आहे.त्याचबरोबर मालिकेतअभिनेत्री सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. यासोबतच ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील अभिनेता आशुतोष पत्की या मालिकेत जानकीच्या दिराची भूमिका साकारत आहे.रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाला सौज्वळ आणि स्वाभिमानी भूमिकेत पाहिलं आहे. मात्र आता या मालिकेत देखील रेश्मा म्हणजेच जानकी एका जबाबदार सुनेचं भुमिका पार पाडणार आहे.त्यामुळे आता प्रेक्षकांना रेश्माला नव्या भूमिकेत पाहण्याची उस्तुकत्ता वाढली आहे. मालिकेत प्रतिक्षाची भूमिका ही खलनायिकेची असणार आहे.दरम्यान आता प्रेक्षकांना मालिका सुरु होण्याची उस्तुकत्ता लागली
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसारच शासनाचं काम सुरु- Devendra Fadnavis
नैराश्यात असलेल्या मनोज जरांगेंना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत – गुणरत्न सदावर्ते