spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Namo Rojgar Melava साठी मुख्यमंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित

बारामतीत आज दिनांक २ मार्च रोजी नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र चर्चा रंगलीय ती या मेळाव्याच्या आडून होणाऱ्या निमंत्रण आणि आमंत्रणाच्या राजकारणची.

बारामतीत आज दिनांक २ मार्च रोजी नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र चर्चा रंगलीय ती या मेळाव्याच्या आडून होणाऱ्या निमंत्रण आणि आमंत्रणाच्या राजकारणची. या मेळाव्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्याला उपस्थित आहेत. तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. हे सर्व नेते एकाच मंचावर उपस्तजीत असल्यामुळे सध्या चर्चेला चांगलंच उधाण हे आले आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या स्टेजवर आसन व्यवस्था पूर्ण करण्यात आलीय आहे. देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी शरद पवार यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. साधारण पावणे अकरा वाजता मुख्यमंत्री बारामतीत येणं अपेक्षित होतं. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना बारामतीत यायला उशीर झाला आहे. अजित पवारांकडून त्यांचं बारामतीतील विमानतळावर स्वागत करण्यात आलं आहे.

यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसलेल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. एरव्ही कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मागील काही दिवसांपासून नमो रोजगार मेळाव्याची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली. शरद पवारांचं नाव पत्रिकेतून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडत आहे.

Latest Posts

Don't Miss