spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लालबागच्या राज्याने केली भक्तांसाठी खास सोय

महाराष्ट्रात गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेश चतुर्थी उत्सवाच्या दहा दिवसीय उत्सवाला दि ३१ ऑगस्टपासून हि सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेश चतुर्थी उत्सवाच्या दहा दिवसीय उत्सवाला दि ३१ ऑगस्टपासून हि सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्त जगभरात गणरायाच्या भक्तांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस मुंबापुरीत आणि विशेषतः लालबागमध्ये गणेशभक्तांची तुफान रेलचेल पाहायला मिळते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे व अशा अनेक मंडळाचे बाप्पा पाहण्यासाठी या दिवसांमध्ये लालबागमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर ३० ऑगस्टपासून कित्येक किलोमीटर दूर रांगा लागल्या आहेत. प्रत्येकालाच रांगांमध्ये उभे राहणे शक्य होतेच असे नाही, त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे एक उत्तम आणि खास नियोयजां करण्यात आले आहे. ते म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय करण्यात आली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया साईट्सवर आपण या जगप्रसिद्ध बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. तसेच या वर्षी लालबागचा राजाने भक्तांच्या घरी ऑनलाइन ऑर्डर करता येणारा प्रसाद पोहोचवण्यासाठी Jio Mart आणि Paytm सोबत भागीदारी केली आहे. लालबागच्या राजाच्या वेबसाइटवरून भाविक प्रसादाची ऑनलाइन ऑर्डर देऊ शकतात. भाविकांनी हे लक्षात घ्यावे की JioMart वर प्रसाद दोन लाडूच्या स्वरूपात उपलब्ध आहे तसेच प्रसादाची डिलिव्हरी फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात उपलब्ध असेल. २५० ग्रॅम सुक्या मेव्याच्या स्वरूपात पेटीएमद्वारे प्रसाद देखील मागविला जाऊ शकतो, जो संपूर्ण भारत आणि परदेशातील भक्तांसाठी उपलब्ध आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सण आहे. १० दिवसांच्या कालावधीत मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणी विविध मंडळांनी उभारलेल्या मंडळामध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात.

हे ही वाचा:

एका आईने पत्राद्वारे लालबागच्या राज्याकडे मागितले मागणं

त्वचेसाठी बटाटा: फायदे आणि कसे वापरावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss