spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bachhu Kadu यांनी केले मोठे विधान, ‘हा’ पक्ष संपवण्याचा भाजपचा प्लॅन!

सध्या राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष अगदी जोरदार तयारीला लागले आहेत.

Loksabha Election 2024 : सध्या राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष अगदी जोरदार तयारीला लागले आहेत. अश्यातच आता अनेकजण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं देखील दिसून येत आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. यात खासदार नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान हे केले आहे.

लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या जागावाटपावर बच्चू कडू यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. जो पर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तो पर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही. भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे. लहान पक्षांसोबत अजूनही कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभामध्ये किती जागा देणारं हे सांगावं. नाही तर आम्ही स्वतंत्र आहे..आम्हाला कुठलंही बंधन नाही. काँग्रेसमध्ये देखील पानदान झाले आहे. सगळ्या फांद्या तुटल्या आहे.

हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. तसंच वंचित आघाडी ही महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील, असं बच्चू कडू म्हणाले. प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आहे. आमच्या मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतोय, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss