spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात पदाधिकारीच उशिरा आल्यामुळे राज ठाकरे तडकाफडकी माघारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता पुण्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक ही बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः उपस्थित होते परंतु या बैठकीला पदाधिकाऱ्यांनी येण्यास उशीर केला त्यामुळे राज ठाकरे हे तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दिनांक ३ मार्च २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. याठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र नंतर या बैठकीची वेळ बदलून २ वाजता करण्यात आली. दोन ते सव्वा दोन वाजता पदाधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. राज ठाकरेदेखील सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले होते. मात्र या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते. ज्यांना बैठकीला बोलवण्यात आलं होतं ते विभागप्रमुखही पोहचले नव्हते. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार होती. राज ठाकरे आल्याचं माहित झाल्यानंतर सगळ्याच पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागातील पदाधिकारी कार्यालयापर्यंत कसेबसे पोहचले. मात्र तोपर्यंत राज ठाकरेंचा राग अनावर झाला होता. आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या सगळ्यांनी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे पुणे मनसेसाठी ही बैठक महत्वपूर्ण होती. मात्र सव्वा ३ वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले.

हे ही वाचा:

“प्यार हुआ इकरार हुआ…” गाण्यांवर थिरकले नीता-मुकेश अंबानी, तर राधिकासोबत अनंतनेही केला धमाकेदार परफॉर्मन्स

ॲनिमल थीम पार्टीत आलिया भट्ट सोबत झळकली राहा, अनंत अंबानींने केला प्रेमाचा वर्षाव… व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss