spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL सुरु होण्यापूर्वीच Chennai Super Kings ला मोठा धक्का

इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

Devon Conway Injury : इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा एक महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे मेपर्यंत लीगमधून बाहेर असणार आहे.

आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. कारण डेव्हॉन कॉनवे (Devon Conway ) किमान मे पर्यंत लीगमधून बाहेर पडला आहे. गेल्या मोसमात अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणारा कॉनवे किमान आठ आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर असेल. वास्तविक, या आठवड्यात त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. ३२ वर्षीय डेव्हॉन कॉनवे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान जखमी झाला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. यानंतर तो फलंदाजीसाठीही येऊ शकला नाही. तेव्हापासून कॉनवे हे वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली होते. मात्र, आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. अशा स्थितीत त्याला परत येण्यासाठी सुमारे ८ आठवडे लागू शकतात.

देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आतापर्यंत IPL 2024 च्या केवळ २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २२ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा झाल्यानंतरच स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सध्या फक्त ७ एप्रिलपर्यंत खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मराठा समाजाचे आरक्षण १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले धन्यवाद

पुण्यात दीड दिवसांत ६०० किलो ड्रग्स जप्त, कुरकुंभमध्ये ड्रग्सचा अड्डा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss