spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लेकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये नीता अंबानींचा खास परफार्मन्स

सध्या अंबानी कुटुंबात प्री वेडिंग फंक्शनची धामधुम सुरु आहे.

सध्या अंबानी कुटुंबात प्री वेडिंग फंक्शनची धामधुम सुरु आहे. जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंगचे कार्यक्रम दिमाखात पार पडले आहेत. १ ते ३ मार्च असे तीन दिवस सुरू असलेल्या वेगवेगळ्या थीमवरील कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमधील भारतीयच नव्हे तर परदेशी मान्यवरांनीदेखील उपस्थिती दर्शवली. ‘अॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’, ‘जंगल फीवर’, ‘हस्ताक्षर’ अशा अनोख्या थीमवर आधारित कार्यक्रमांनी जामनगर सजलं होतं.आणि या कार्यक्रमानी सगळ्यांचे लक्ष देखील वेधून घेतले.

दिव्यांची रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट, भव्य मंच या साऱ्यामुळे अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे कार्यक्रम शानदार ठरले. नृत्य, गायन सादरीकरणासह अनेकांची मनोगतं लक्षवेधी ठरली. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो अनंत अंबानी याच्या मनोगताचा. तो त्याच्या भावना व्यक्त करत असताना मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले. या भावूक क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसंच राधिकाचं मनोगत, त्यावेळी तिनं परिधान केलेला पेहराव आणि एकूणच तिचा मंचावरील वावर हे सारं काही लक्षात राहणारं होतं. तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या आदरातिथ्यानं उपस्थित मान्यवर भारावून गेले. अनंतचा भाऊ आकाश आणि बहीण इशा अंबानी यांनी देशी-परदेशी पाहुण्यांचं अगदी घरच्यासारखं स्वागत केलं. दिमाखात पार पडलेले हे प्री-वेडिंगचं संपूर्ण जग साक्षीदार झालं होतं.

तिसऱ्या दिवशी ‘हस्ताक्षर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी सगळ्यांनी भारतीय पोषाख करायचे होते. या खास कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं नीता अंबानी यांच्या नृत्य सादरीकरण.

नीता अंबानी यांना आधीपासूनच नृत्याची आवड आहे. घरातल्या वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये त्यांनी याआधीही अनेकदा नृत्य सादरीकरण केलं आहे. अनंत आणि राधिकाच्या या प्री-वेडिंग फंक्शनमध्येही त्यांनी डान्स परफार्मन्स करत सगळ्यांचीच मनं जिंकली. ‘या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः’ या मंत्रानं नीता यांच्या नृत्याची सुरुवात झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांनी ‘विश्वंभरी अखिल विश्व तनी जनेता विद्या धरी वदनमा वसजो विधाता’ या भजनावर पारंपारीक नृत्य त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.त्यांच्या नृत्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

हे ही वाचा:

नागपूरमध्ये आज भाजपच्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

बाळूमामानंतर सुमीत पुसाळकर झळकणार ‘घरोघरी मातीच्या चुली’या नव्या कोऱ्या मालिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss