spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.

भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे. हे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. आणि आता भारतील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केलं आहे. आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय नौदलाच्या नव्यानं अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपऱ्यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचं चिन्ह आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमार दलाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांनी समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. शिवरायांनी नौदलाचा विकास केला. भारतीनं आज गुलामगिरीची निशाणी उतरवली.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करत म्हटलं आहे की, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्य भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे.

हे ही वाचा:

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss