spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; कार्यक्रमस्थळी जमलेल्या स्थानिकांची मागणी

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाचे आज उदघाट्न होणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाचे आज उद्घाटन होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते होणार आहे. भरवीर ते इगतपुरी हा समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आहे. इगतपुरी पथकर प्लाझामध्ये मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. मात्र आज या कार्यक्रमस्थळी अचानक ग्रामस्थ आल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमल्याने पोलीस (Police) यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली.

नवीन तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, अशी मागणी स्थानिक तरुणांनी केली आहे. यावेळी स्थानिक मुलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. तिसऱ्या टप्यातील समृद्धी महामार्गाचे काही वेळातच उद्घाटन होणार आहे. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक एकत्र आल्याने रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून पोलीस त्यांना माघारी पाठवत आहेत. त्यामुळे आता शासन यावर काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील२४.८७२ कि.मी लांबी असलेला आणि एकूण १६ गावांतून जाणारा हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. या नवीन महामार्गासाठी १०७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या टप्प्यात पॅकेज १३ अंतर्गत १ व्हायाडक्ट (२०० मी लांबी), दारणा नदीवरील १ मोठा पूल (४५० मी), ८ छोटे पूल, वाहनांसाठी ५ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ८ भुयारी मार्ग, ९ ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील ४ इंटरचेज, १४ टोलबूथ, २ वे-ब्रिज, १ टनेल-२७५ मी, २७ बॉक्स कल्वर्ट, २७ युटीलीटी डक्ट व पॅकेज १४ अंतर्गत १ व्हायाडक्ट (९१० मी लांबी) यांसारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित कामाचे लोकार्पण लवकरच होणार आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर केल्यानंतर ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होणार आहे. त्यामुळे १ तासांत शिर्डीमध्ये पोहचता येणार आहे. शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या भागातील शेतकऱ्यांना शेत मालाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ ठरणार आहे. यामुळे येणे व जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.

हे ही वाचा:

लेकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये नीता अंबानींचा खास परफार्मन्स

बाळूमामानंतर सुमीत पुसाळकर झळकणार ‘घरोघरी मातीच्या चुली’या नव्या कोऱ्या मालिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss