spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

झारखंडमध्ये बाईकर फर्नांडावर सात जणांकडून पतीसोबत असताना बलात्कार

विशाल भारत बघण्यासाठी जगभरातून पर्यंटक भारतात येत असतात.कधी येथली संस्कृती तर कधी नद्या,नाले ,जलाशय,तर कधी लोकजीवन आणि संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी परदेशी नागरिक भारतात येत असतात.

विशाल भारत बघण्यासाठी जगभरातून पर्यंटक भारतात येत असतात.कधी येथली संस्कृती तर कधी नद्या,नाले ,जलाशय,तर कधी लोकजीवन आणि संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी परदेशी नागरिक भारतात येत असतात.या नागरिकांना भटकंती करताना सुरक्षा मिळावी त्यांच्या जीवीताचं आणि मालमत्तेचं सरक्षणं व्हाव अशी या पर्यटकांची आणि त्यांच्या देशाची ही भावना असते. अशीच भावना ब्राझिलियन बाईकर फर्नांडाची ही होती.पण तिच्यसोबत जे घडलं ते फक्त भयंकरचं नव्हे तर संवेदना गोठवून टाकणारा प्रकार घडला आहे.

दरम्यान एरव्ही धर्मापासून ते परंपरेपर्यत आणि राजकारणापासून ते इतिहासापर्यत या सगळ्यावर हिरिगिरीने व्यक्त होणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत संतापजनक x केलंल आहे.त्यात त्यांनी म्हंटलं आहे.आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा !! ६२ देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बाइकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात ७ जणांनी बलात्कार केला. ज्या नराधमांनी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी..

ही पीडित महिला आपल्या पतीसह बाईकवरुन ट्रिपवर निघाली होती.  हे ब्राझिलियन जोडपे मोटारसायकलवरून बांगलादेशहून आले होते. त्यांना नेपाळमध्ये जायचे होते.बिहारच्या भागलपूर येथे जात असताना त्यांनी झारखंडच्या डुमकी मार्केट जवळ एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान पीडितेवर अत्याचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला मारहाणदेखील झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यावर काही स्थानिक टोळक्याची नजर पडली. त्यांनी या ब्राझिलियन जोडप्याची छेडछाड केली आणि त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर ३५ वर्षीय पीडित महिलेने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.पण ती ब्राझिलियन इंग्रजी बोलत असल्यामुळे पोलिसांना काही समजले नाही. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याचे कळले. महिलेने आरोपींचे जे वर्णन केले, त्यावरुन तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडितेने एकूण सात आरोपी असल्याचे म्हटले आहे. इतरांनाही शोधण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान आता या घटनेनंतर देशभरातील बाईक राइडर मंडळी आता सोशल मीडियावरून निषेध व्यक्त करत आहेत. या ब्राझिलियन जोडप्याने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. झारखंड पर्यटनासाठी योग्य नाही, अशाही प्रतिक्रिया लाखो नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.दरम्यान यावरुन झारखंडच्या प्रशासकाने जे काही समझायचे ते समजुन जावे.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; कार्यक्रमस्थळी जमलेल्या स्थानिकांची मागणी

‘कन्नी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर टाळ्या, शिट्यांच्या जल्लोषात प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss