spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलो तर तुझा,गेलो तर समाजाचा,मनोज जरांगे यांच्या संघर्षयोध्दा चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन उभारणारे  मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संघर्ष योद्धा'  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन उभारणारे  मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या ‘संघर्ष योद्धा’  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मनोज जरांगे यांचा संघर्षप्रवास आता मोठ्या पडद्यावर उलघडण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘संघर्ष योद्धा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन या भोवती चित्रपट बेतला असल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे.

मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देत आहेत.त्यांचा हा मराठा समाजासाठी असणारा लढा एखाद्या योध्दा सारखाच होता.आणि या सर्व संघर्षानंतर मनोज जरांगे पाटील हे चांगलेच प्रसिद्धी झोतास आले.त्यांचे उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाच्या टीजरमधून दिसत आहे. लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचे वातावरण चित्रपटातही टिपला गेला आहे. तर मनोज जरांगे यांच्या म्हणजेच रोहन पाटीलच्या तोंडी असलेले संवादही लक्ष वेधून घेतात. ‘मी बायकोला सांगतानाच सांगितलंय आलो तर तुआ, गेलो तर समाजाचा’ हा डायलॉग सध्या चांगलाच चर्चेत आलाय.त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीजरमधून स्पष्ट होत आहे.

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचं बरंच शूटिंग हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथंच झालं आहे.अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांच्या भूमिकेत आहे. तर गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे तर पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांचे आहेत. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री सुरभी हांडे, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होतोय.२६ एप्रिलपासून जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.दरम्यान सर्व मराठा समाज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

हे ही वाचा:

Shivajirao Adhalarao Patil यांची उमेदवारी निश्चित ?, एकाच गाडीतून केला प्रवास

आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी दिला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss