spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत,त्यांनी निवडणूक लढवू नये; मंत्री हसन मुश्रीफ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.सर्वच पक्षांकडून प्रचार केला जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांनी निवडणूक लढवू नये. आम्ही त्यांना याबाबत विनंती केली आहे. कारण जनतेची तशी इच्छा आहे. शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूरच्या जागेबाबत आज आमच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. महाराष्ट्राची जाहीर झाली नाही कारण तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसल्याशिवाय ते होणार नाही. आज अमित शाह साहेब येतील. दोन्ही पक्षांचे नेतेमंडळी चर्चा करतील. ते निर्णय घेतील. त्याप्रमाणे जागा वाटप झाले की उमेदवारांची निवड होईल, असे हसन मुश्रीफ म्हणाले. महाविकास आघाडीमधून कोल्हापूरची जागा शरद पवार यांना देण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा शरद पवार गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. या जागेच्या बदल्यामध्ये काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला देणार असल्याची शक्यता आहे. शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार झाले तर आम्हाला आनंद होईल, असे शरद पवार म्हणाले.

आमचं काय चाललय हे पाहण्यापेक्षा त्यांनी त्यांचं पाहावं.आता निवडणूका तोंडावर आल्या आहेत. आता आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे त्यांनी स्वत:चं बघावं एवढी आमची विनंती त्यांना आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत. तरीही त्या मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत चर्चा का होते?, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात माझ्या जीवाला धोका असल्याचे लिहिण्यात आले आहे. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, दत्ता मामा भरणे यांनी धमकी दिली ही चुकीची माहिती आहे. दत्तामामा भरणे आणि त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीची धमकी देणार नाही कारण त्यांचा तसा स्वभाव नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

Latest Posts

Don't Miss