spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात होणार रेकॉर्डब्रेक नमो रोजगार मेळावा – DR. Shrikant Shinde

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू सराव करत असतात. खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी नवीन रनिंग ट्रॅकची मागणी केली होती. ४०० मीटरचा नवीन रनिंग ट्रॅक या ठिकाणी बनत आहे. ८० लाख रुपये निधी त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिला असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

२५० ते ३०० मुले रोज याठिकाणी सराव करतात. पालक आणि खेळाडू दोघेही खुश आहेत. २५ दिवसांच्या आत ट्रेंडर महापालिकेने काढले आहे. येणाऱ्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच रनिंग ट्रॅक या ठिकाणी बनत आहे. ठाण्याला आणखी एका नवीन स्टेडियमची गरज आहे. त्यासाठी आयुक्तांनी जागा पाहिली असून त्याचे काम सुरु आहे, असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च आणि ७ मार्च २०२४ रोजी नमो रोजगार मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत-जास्त युवक या रोजगार मेळाव्याला येतील, हा रोजगार मेळावा रेकॉर्ड ब्रेक असेल. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील, अब की बार ४०० पार दिसतील, राज्यात ४५ पार दिसेल. प्रत्येक कार्यकर्ता आग्रही असतो, निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, जो निर्णय घेण्यात येईल तो आम्हाला मान्य असेल. असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’

आलो तर तुझा,गेलो तर समाजाचा,मनोज जरांगे यांच्या संघर्षयोध्दा चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss