spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादळ उठण्याची चिन्हे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister of the state Eknath Shinde) महत्त्वाच्या मंत्र्यांसह आमदारांना घेऊन बंड करत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister of the state Eknath Shinde) महत्त्वाच्या मंत्र्यांसह आमदारांना घेऊन बंड करत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. कोलमडलेल्या शिवसेनेवर संकट आणत त्यांनी आपला वेगळा गट स्थापन करत भाजपासोबत सरकारही आणलं. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political crisis) झालेले भूकंपाचे धक्के अजूनही कायम राहण्याची चिन्हं आहेत. कारण आता शिवसेनेनंतर या शिंदे गटाने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचं दिसत आहे. काँग्रेसही लवकरच फुटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस (Congress) नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादळ उठण्याची चिन्हं आहेत.

सरकार स्थापन झाल्यावर जवळपास महिन्याभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र हा विस्तारही केवळ पहिल्या टप्प्यातला झाला. आता पुन्हा साधारण महिन्याभराचा काळ गेला असून दुसऱ्या टप्प्यातला विस्तार अद्याप प्रलंबित आहे. आता हा दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार धक्कातंत्राने होण्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून जुन्या नेत्यांचा आणि माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात दोन महिलांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तृळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील फाटाफूट समोर आली होती. काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मते फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण १२ मतं फुटली. काँग्रेसची ६ मतं फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये भाजपला अतिरिक्त २७ मतं मिळाली होती.

हे ही वाचा:

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss