spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivsena – BJP मध्ये वादाची ?, रामदास कदम इशारा देत म्हणाले…

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. अश्यातच आता लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वाद होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. अश्यातच आता लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वाद होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चाही केली. तर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

यावेळी बोलत असताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले आहेत की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपासोबत आला आहोत. त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका. याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं, सांगत माझंही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा, असा सज्जड इशाराच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला आहे. ‘माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा’, असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहित नाही, पण पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर, माझं नाव पण रामदार कदम आहे, हे मी आज सांगतोय, अशा कडक शब्दात रामदास कदमांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. रामदास कदम पुढे म्हणाले की, ‘माझी प्रामाणिक इच्छा आहे की, मोदी, शाहांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. आपला पक्ष प्रत्येकाला वाढवायचाच आहे. पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत, त्यांच केसाने गळा कापून नको. भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज जात आहे, याचा भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे.’

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल, त्यांच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल,तर भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss