spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आगामी निवडणुकीत फडणवीसांना बाप्पा पावणार?

राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. ही मिळालेली सत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सण उत्सवाच्या माध्यमातून नेतेमंडळी करताना दिसतात.

राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. ही मिळालेली सत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सण उत्सवाच्या माध्यमातून नेतेमंडळी करताना दिसतात. त्यात मुंबई, पुण्यासह (Mumbai – Pune) प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आधी कृष्णाचा आशीर्वाद आणि आता गणरायाचा आशीर्वाद मागत नेतेमंडळी फिरत आहेत. पण जनतेचा आशीर्वाद नेमका कोणाला मिळतो हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल. नुकताच दहीहंडी पाठोपाठ आता गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) निमित्ताने महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP leader and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पन्नासहून अधिक घरगुती गणपतींना भेटी दिल्या.

 आधी दहीहंडी आता गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भेटी मोठ्या प्रमाणात भेटी गाठी या वाढत चालल्या आहेत. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे गेल्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस मुंबईभर फिरत आहेत. आधी दहीहंडीच्या उत्सवानिमित्ताने फडणवीस यांनी मुंबई पिंजून काढली होती. आता गणेश उत्सवाचं निमित्त करुन छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आहेत.

 एकीकडे सण उत्सवाच्या निमित्ताने जोरदार भेटीगाठी सुरू आहेत तर दुसरीकडे मुंबईभर भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली. बेस्ट बस आणि बस स्टॉपवर बॅनर झळकले. मुंबई भाजपच्यावतीने बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये ‘आपले सरकार आले…हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ अशी ओळ आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. तर एका बाजूला भाजपचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ आहे. या जाहिरातीमधून आधीच्या सरकारच्या काळात हिंदू सणांवरच निर्बंध होते, असे सुचवण्यात येत असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss