spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाचे आमदार Ravindra Waikar यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश….

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीत आहेत. अश्यातच आता ठाकरे गटातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ravindra Waikar : राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीत आहेत. अश्यातच आता ठाकरे गटातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं होतं. अशातच आता थेट रवींद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहुर्त सापडला असून लवकरच ते एकनाथ शिंदेंची साथ देताना दिसणार आहेत. आतापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, रवींद्र वायकरांच्या रुपात उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा:

Miss World 2024 या कार्यक्रमात पोहचल्या नीता अंबानी अन् ईशा अंबानी…

दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे, राज्यपालांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss