spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive: ED च्या तुरूंगवारीला घाबरलेल्या Ravindra Waikar यांची आज शिंदेंकडे धाव, निष्ठावंत शिवसैनिकांची वायकरांकडे पाठ

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याने पुण्यात येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याबद्दलची बातमी सर्वात आधी टाईम महाराष्ट्रने दिली होती. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, आणि आज हेच रवींद्र वायकर हे त्यांचा पक्ष सोडून आता नव्या दिशेने नव्या पक्षाची वाटचाल करणार आहेत. शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना जोगेश्वरी मुंबई महानगपालिका भूखंडाचा घोटाळा केला. याप्रकरणी ED ने वायकरांविरोधात तक्रार दाखल केली.त्यामुळे तुरूंगवारीला घाबरून रवींद्र वायकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूकडे दिशा वळवली आहे.

रवींद्र वायकर यांच्याविरोधात ED ची कारवाई झाल्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार अशा नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, पक्षाचे सर्वेसर्वा, व्यावसायिक भागीदार असणारे उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जायचं. याबद्दलचा कौल या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळवला आहे. नियतीचा खेळ असा की, कॉंग्रेसचे नगसेवक संजय निरुपम यांच्या अगदी निकटचे समजले जाणारे कमलेश रॉय हे आहेत. कमलेश रॉय हे एकेकाळी रवींद्र वायकर यांच्या कार्यालयात जाऊन बसायचे, आणि कमलेश रॉय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रवींद्र वायकर यांना घेऊन जाण्याचं काम केलं. त्यानंतर रवींद्र वायकर यांना हा निर्णय भाग पडलं त्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या पत्नीचा दबाव आणि प्रेमाने केलेल्या मागणी. यामुळेच रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची वाट सोडून आता एकनाथ शिंदे यांची वात धरली आहे. १० मार्चच्या रात्री रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील. 

हे ही वाचा:

Miss World 2024 या कार्यक्रमात पोहचल्या नीता अंबानी अन् ईशा अंबानी…

दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे, राज्यपालांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss