spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय जनता पक्ष आता भारतीय काँग्रेस झाला आहे, संजय राऊत

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीत आहेत. अश्यातच ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे.

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीत आहेत. अश्यातच ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. संजय राऊत आज सकाळी मुंबई मध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, यावर माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे हे जाणून घ्या. मुख्य म्हणजे जो वायकारांना तुरुंगात टाकणार होता, त्याने सातत्याने रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले, ज्याने सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या, तो मुलुंडचा पोपटलाल पक्षप्रवेशानंतर मुलुंडच्या घरात आतून कडी लावून बसलेला आहे त्याला बाहेर काढा आधी आणि त्याचे मत घ्या. वायकर हे आता वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत. आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस त्या पक्षात गेला की तो स्वच्छ होतो, पवित्र होतो वायकरांचेही तसेच झाले आहे. शेवटी माणसाने हिंमत दाखवायचे असते, लढायच्या वेळेला पळून जाणारे यांची नोंद इतिहासात होत नाही. त्यांचा निर्णय त्यांनी जरी घेतला असला तरी यात भाजपचीच नाचक्की झाली आहे. तुम्ही कालपर्यंत वायकारांना तुरुंगात टाकायला निघाले होतात ना, त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे काय काय आरोप केले होते, मग आता त्या आरोपांचं काय झाले ? ज्याने वर्षभरामध्ये वायकरांचा छळ केला तो मुलुंडचा पोपटलाल आता कुठे आहे ? वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतले आहे त्याने आता बोलावे असं म्हणत राऊतांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लबोल हा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहे. निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहे. निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत संजय राऊत म्हणाले आहेत की, निलेश लंके यांचे मी स्वागत करतो, निलेश लंके हे शरद पवारांकडे येतील हे मला माहीत होते. ते त्या भागातून निवडणूक लढवतील, निलेश लंके हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे. निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी जर आज शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो. तसेच राऊत पुढे म्हणाले आहरेत की, आज शिवसेनेमध्ये दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश होत आहेत. जळगाव भाजपच्या ललिता पाटील त्या आज साडेबारा वाजता शिवसेनेत प्रवेश करतील. दुपारी तीन वाजता डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करतील. डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील सांगलीतून १००० गाड्यांचा ताफा घेऊन ते निघाले आहेत. या दोन्ही प्रवेशामुळे त्या त्या भागांची ताकद अधिक मजबूत होणार आहे.

तर पुढे संजय राऊत म्हणले आहेत की, भारतीय जनता पक्ष आता भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही तो भारतीय काँग्रेस झाला आहे. भारतीय जनता पक्ष असतात तर तो असा तुकडा ताकडामध्ये अडकून कोणालाही मांडीवर घेऊन बसला नसता. विचारधारा असलेला पक्ष होता, आम्ही जेव्हा त्या पक्षाबरोबर काम केलेला आहे तेव्हा त्या पक्षाला विचारधारा होती आज गटारधारा आहे.

हे ही वाचा:

Miss World 2024 या कार्यक्रमात पोहचल्या नीता अंबानी अन् ईशा अंबानी…

दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे, राज्यपालांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss