spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही- CM Eknath Shinde

या संविधानामुळेच सर्वसामान्य व्यक्ती खासदार, आमदार, मुख्यमंत्री बनू शकतो.

कल्याण-डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन माध्यमाच्या मदतीतून उपस्थिती दर्शवली होती. कल्याण-डोंबिवलीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय (५/ड प्रभाग) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. Babasaheb Ambedkar) ज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती, महाराष्ट्र शासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. Babasaheb Ambedkar) यांच्या शिकवणीनुसार सामाजिक क्रांतीचा वसा घेऊन हे शासन काम करीत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शिक्षण, आर्थिक, विचार स्वातंत्र्य ही डॉ. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण हाच या सरकारच्या राज्यकारभाराचा पाया आहे. या संविधानामुळेच सर्वसामान्य व्यक्ती खासदार, आमदार, मुख्यमंत्री बनू शकतो. डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे अशा स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही. परंतु त्यांचा जीवनपट अशा स्मारकांमधून लोकांसमोर आणल्यानंतर हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जास्रोत ठरणार आहे, असे सांगून सरकारच्या माध्यमातून या स्मारकाच्या पुढील निर्माणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी स्पष्ट केले.

 

कल्याण येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale), खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (DR. Shrikant Shinde), महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड (DR. Indurani Jakhad), डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, उपाध्यक्ष विवेक जगताप, माजी महापौर रमेश जाधव, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचे आमदार Ravindra Waikar यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश….

Exclusive: ED च्या तुरूंगवारीला घाबरलेल्या Ravindra Waikar यांची आज शिंदेंकडे धाव, निष्ठावंत शिवसैनिकांची वायकरांकडे पाठ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss