spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑस्करवर ‘ओपनहायमर’ चित्रपटाने उमटवली मोहोर

ऑस्कर २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात  प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटानं बाजी मारली आहे.

ऑस्कर २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात  प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटानं बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते. ऑस्करमध्ये ओपनहायमर या चित्रपटाला 13 नामांकन मिळाली होती. नोलनच्या ओपनहायरमनं यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात कमाल केली आहे. ओपनहायरमला बेस्ट पिक्चर्स, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट अॅक्टर, बेस्ट सर्पोटिंग अॅक्टर, बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट ओरिजनल स्कोअर आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी यासाठी मानाचे ऑस्कर मिळाले आहे. एकुण  सात पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलं आहे. भगवद् गीतेचा अभ्यासक ते अणूबॉम्बचा चाहता असणाऱ्या जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ख्रिस्तोफर नोलन याने ओपनहायमर  या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा  सांभाळली आहे. अणुबाँबचा शोध लावणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहामयरवर चित्रपट असून या चित्रपटाला जगभरातल्या प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक प्रकारची पर्वणीच असते. आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी नोलन ओळखला जातो. आणि त्याच्या नवनवीन कल्पनांमुळे तो प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करतो. ख्रिस्तोफर नोलनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतात. टेनेट, द डार्क नाइट राइजेस , इंटरस्टेलर , इन्सेप्शन , बॅटमॅन बिगिन्स , इन्सोमॅनिया , द डार्क नाइट , डंकर्क , मोमेंटो , द प्रेस्टिज हे ख्रिस्तोफर नोलनचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी आपली छाप सोडली आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं. अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं. आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरतंय. त्याच अणुबाँबचा शोध जे रॉबर्ट ओपनहायमर यांनी लावला.

ओपनहायमरच्या माध्यमातून त्यानं अणुबॉम्बचा शोध, त्याचा केला जाणारा वापर, त्याचे जागतिक राजकारणावर झालेले परिणाम, अमेरिकेचं धोरण आणि या सगळ्याचा मानवतेशी असलेला संबंध यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही- CM Eknath Shinde

भारतीय जनता पक्ष आता भारतीय काँग्रेस झाला आहे, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss