spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसऱ्या मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरूच; शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी केला शिवाजी मैदानासाठी महानगरपालिकेत अर्ज

शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात 'शिवाजी पार्क कुणाचं?' असा वाद चांगलाच रंगलाय

शिवसेना आणि दसरा मेळावा हे नातं फार जुनं आहे. गेल्या कितीतरी वर्षांपासून शिवसेना सातत्याने दसरा मेळावा आयोजीत करतेय आणि अगदी कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसऱ्या मेळाव्याला हजेरी लावत असतात. पण यंदा चित्र काहीसं वेगळं आहे. शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात ‘शिवाजी पार्क कुणाचं?’ असा वाद चांगलाच रंगलाय आणि शिंदे गटाने केलेल्या एका नव्या हालचालीमुळे ऐन गणेशोत्सवात या वादाला एक नवीन वळण आलं आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले होते. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याला संबोधित करावे अशी मागणी मनसैनिकांनी त्यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सध्या दसरा मेळाव्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय, गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. पण शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून शिवसेना कुणाची?, शिवसेनेचे चिन्ह कुणाचे? असे वाद कोर्टात सुरु असताना आता शिवसेनेच्या कार्यक्रमांचे देखील विभाजन होणार कि काय असे चित्र आता दिसू लागले आहे. कारण स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्कवर कार्यक्रम करता यावा म्हणून महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे आणि यात एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेने उद्धव ठाकरेंनी परवानगी मिळावी म्हणून केलेल्या अर्जावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

तसेच मुंबई महानगरपालिकेकडून अर्ज मंजूर करण्यासाठी होत असलेला विलंब आणि सध्या सत्तेत असणारा शिंदे – फडणवीस यांच्यामुळे शिवसेनेने केलेला अर्ज मान्य करण्यासाठी जाणूनबुजून उशीर केला जात आहे, असेही आता दिसून येत आहे. या सर्व प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातूनसुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नुकतेच दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा ढोंगीपणा चालला असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे बाळासाहेबांचे नाव वापरायचे, शिवसेनेचे नाव वापरायचे, भाजपाची मदत घ्यायची. हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

बायचुंग भुतियांना हरवत माजी फ़ुटबॉल खेळाडू कल्याण चौबे बनले भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष

व्हिडिओ होतोय तुफान वायरल, आमदार महिलेला पतीने लगावली कानशिलात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss