spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धक्कादायक! लातूरमध्ये दिव्यांग महिलेवर अत्याचार

पीडित महिला ही कर्णबधीर आणि मुकबधीर असून ती लातूर येथील रहिवासी आहे.

देशात तसेच महाराष्ट्रात सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आतापर्यंत या बलत्काच्या घटनांमध्ये महिला, वृद्ध महिला, लहान मुलींवर अत्याचार होत असल्याच्या दर्शन बातम्या समोर येत होत्या मात्र आता लातूरमध्ये माणसाच्या रानटी आणि वृत्तीचे दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे. एका दिव्यांग महिलेवर ( Disabled woman) काही अज्ञात पुरुषांनी लैंगिक अत्याचार (Sexual assault ) केल्याची माहिती समोर आली आहे आणि याहून धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.

पीडित महिला ही कर्णबधीर आणि मुकबधीर असून ती लातूर येथील रहिवासी आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग महिलेवर अत्याचार करण्यात आले आहेत. तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेत संशयितांने तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेनंतर पीडित महिला आपल्या नातेवाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. परंतु, पोलिसांनी पीडितेची तक्रार घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर नातेवाईक आणि एका सामाजिक संस्थेच्या रेट्यामुळे पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल करून घेतला, अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली.

सहा दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केले. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गातेगाव पोलीस ठाणे गाठत संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

पीडितेवर काय अन्याय झालाय हे सांगंण्यास सक्षम नसलेल्या या तरुणीच्या सांगण्यावरून नेमका काय गुन्हा दाखल करावा या गोंधळात पडल्यामुळे गातेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी बराच वेळ घेतला. यामुळे पीडितेचे मेडिकल होऊ शकले नाही. निर्धार सेवाभावी संघटना आणि नातेवाईकांनी लातूरचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा:

भाजपमध्ये प्रवेश करणार का प्रवेश? राजकीय चर्चांना अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

गौरीपूजनास महालक्ष्मी पूजन देखील म्हणतात, जाणून घ्या गौरी आगमनाबद्दल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss