spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश,लोकसभा निवडणुक लढवण्याची शक्यता

सध्या आता सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत.अनेक नेते मंडळीदेखील पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत

सध्या आता सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत.अनेक नेते मंडळीदेखील पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत.अशात आता प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी राजकारणात एन्ट्री केरत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.आता काही वेळातच लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.. यामध्ये देशातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यातच देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक राजकीय प्रवेश होत असल्याचं पाहायला मिळतंय. यातच आता अनुराधा पौडवाल यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलंय. 

दरम्यान भाजपमध्ये अनुराधा पौडवाल यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच त्या भाजपसाठी स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे त्यांच्या या प्रवेशानंतर पक्षात त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. दरम्यान लोकसभा लढवणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं, की आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी आनंदाने स्विकारेन. 

  अनुराधा पौडवाल यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि भाषांसह 9,000 हून अधिक गाणी आणि 1,500 हून अधिक भजने गायली आहेत.‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘बेटा’ यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अनुराधा पौडवाल या गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ गायनक्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांचे 1969 मध्ये अरुण पौडवला यांच्याशी विवाह झाला. अरुण पौडवाल हे एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. अनुराधा पौडवाल यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आदित्य पौडवाल आणि एक मुलगी कविता पौडवाल. 1991 मध्ये तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. अरुण पौडवाल यांच्या विवाह झाल्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. अभिमान या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा जया भादुरीसाठी श्लोक गायला होता. त्यानंतर प्रत्येक चित्रपटात अनुराधा यांच्या आवाजातील गाणं असायचंच, असा काळ सुरु झाला. 

हे ही वाचा:

“तर पहिल्यांदा भारताला वाचवण्यासाठी येणार, अमेरिकेला नाही”अक्षय कुमारने केले सरकारला आवहान

गोपाळ शेट्टींनी हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं, फटकळपणाने कामाच्या वाघाला घरी बसवलं | Gopal Shetty

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss