spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पावडर पासून केव्हाही बनवू शकता रसरशीत गुलाबजाम

पावडर पासून केव्हाही बनवू शकता रसरशीत गुलाबजाम

गुलाबजाम या पदार्थाचे नाव घेतल्यावर लगेच तोंडाला पाणी सुटते. कारण हा पदार्थ तितकाच स्वादिष्ट आणि मधुर असतो. गुलाबजाम हा पदार्थ सर्वांना आवडतो. गुलाबजाम पदार्थ हा भारतातील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे,तसेच हा पदार्थ लग्नात,पार्टी,घरगुती कार्यक्रम,सणांमध्येही बनवता येतो.तसेच हा असा पदार्थ आहे कि आपण रात्री जेवल्यानंतर खाऊ शकतो.तसेच गुलाबजाममध्ये खवा वापरून गुलाबजाम बनवता येतो. तर आज आपण जाणून घेऊया मिल्क पावडर पासून रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे.

रेसिपी –

साहित्य –

  • १ कप मिल्क पावडर.
  • अर्धा कप मैदा(१/२)
  • २ चमचे साजूक तूप.
  • बेकिंग पावडर (अर्धा चमच)
  • पाव कप (थंड दूध)
  • तेल
  • साखरेचा पाक –
  • साहित्य –
  • १ कप मिल्क पावडरसाठी ( २ कप साखर )
  • २ कप पाणी
  • २ वेलची
  • अर्धा लिंबाचा रस
  • केसर

कृती –

  • सर्व प्रथम बाउल घेणे.
  • बाउल मध्ये मिल्क पावडर , मैदा, साजूक तूप, बेकिंग पावडर , सर्व मिश्रण एकत्र करून घेताना तूप सर्व बाजूने नीट चोळून घेणे आणि मग मिश्रण एकजीव करून घेणे. मग त्यात थंड दूध ओतून आणि पिठ मळून घेणे. पिठ मुरेपर्यंत साखरेचा पाक बनवून घेणे.
  • साखरेचा पाक बनवण्यासाठी सर्व प्रथम कढई गॅसवर ठेवणे आणि कढई मध्ये २ कप साखर टाकणे. साखरेमध्ये २ कप पाणी घालणे. मग वेलची घालणे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालणे आणि मिश्रण ढवळून घेणे.जेणेकरून पाक चिकट होणार नाही. आणि पाकाला रंग येण्यासाठी केसर घालणे. आणि १० मिनिटं मंद आचेवर शिजवून परत मिश्रण चांगले ढवळुन घेणे. नंतर थोडे पिट हातात घेऊन दाबुन घेणे. मग गोळे तयार करून घेणे.गोळे तयार होईपर्यंत तेल गरम करून घेणे. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये गुलाबजामचे गोळे एक – एक करून सोडून देणे आणि चांगले ३ ते ४ मिनटे तळून घेणे.तळून झाल्यानंतर गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढून घेणे. प्लेटमध्ये गुलाबजाम काढून घेतल्यानंतर कोमट पाकामध्ये गुलाबजाम सोडून देणे.आणि २ तास झाकून ठेवणे.आणि मस्त गुलाब जामून खाण्यासाठी तयार आहेत.

हे ही वाचा:

शहाजी बापू पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे युवासेना झाली आक्रमक

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss