spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोरफड कशी ठरते केसांसाठी उपयुक्त, घ्या जाणून

केस गळण्यास रोखण्यापासून ते केसांच्या अनेक समस्यांवर कोरफड खूप फायदेशीर आहे.

लांब आणि दाट केस सर्वाना आवडतात. केस लांब आणि दाट असली की, चेहऱ्यावर तेजपणा येतो. आणि चेहेरा सुंदर दिसतो. कोरफड अनेक समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. कोरफडीमुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. केस गळण्यास रोखण्यापासून ते केसांच्या अनेक समस्यांवर कोरफड खूप फायदेशीर आहे. कोरफडपासून तेल सुद्धा बनवता येते. कोरफडीचे तेल केसांना लावल्यावर केसातील कोंडा कमी होतो. कोरफोड पासून जेल सुद्धा बनवता येते. कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. शरीरावरील सुरकुत्या जाण्यासाठी कोरफडचा उपयोग करू शकतो. गुणधर्मकारी आयुर्वेदामध्ये कोरफडला एक सर्वगुण संपन्न वनस्पती मानले जाते. आरोग्य असो किंवा सौंदर्याशी निगडीत समस्येवर कोरफड प्रभावी ठरते. कोरफड शरीरातील अवयवांना जितकी उपयोगी ठरते. तितकीच बाहेरील त्वचेला देखील लाभदायक ठरते.तर चला जाणून घेऊया कोरफड तेलाचा वापर.

  • कोरफड तेल कसे वापरणे – हे तेल सर्व केसांना लावा. हळूवारपणे मालिश करा जेणेकरून टाळू तेलाचे गुणधर्म शोषून घेईल. आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावू शकता. २० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. यानंतर आपले नियमित शैम्पू आणि कंडिशनर वापरू शकतो.
  • कोरफड तेलाचे फायदे – केसांचे पोषण होते. केसांचे गळणे कमी करते. कोंडा कमी करण्यास कारणीभूत. डोक्यातील खाज दूर होते.
  • कोरफड तेल कसे बनवणे – हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला कोरफड जेल आणि खोबरेल तेल लागेल. प्रथम कोरफड घ्या आणि कोरफड जेल टाका . कोरफडचा लगदा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या .यानंतर कोरफड काढा आणि बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये खोबरेल तेल आणि कोरफड घाला. तेल हळूहळू तपकिरी होऊ लागेल. तेल थंड होऊ द्या आणि नंतर गाळून घ्या.

हे ही वाचा:

२०२२ मधील काही इंनोवेटिव्ह महिला सुरक्षा गॅझेट्स

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss