spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई लोकलवरील मोठा अनर्थ टळला

मुंबई लोकल हे सर्वांसाठीच एक महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे. एक मिन जरी लोकल येण्यास उशीर झाला तरी अनेकांची काम हि खोळंबतात.

मुंबई लोकल हे सर्वांसाठीच एक महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे. एक मिन जरी लोकल येण्यास उशीर झाला तरी अनेकांची काम हि खोळंबतात. आणि अश्यातच काल मुंबई लोकलच्या रुळावर १५ ते २० किलो दगड भरून लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न हा केला गेला आहे.

दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सीएसएमटीवरुन (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) खोपोलीकडे (Khopoli) जलद मार्गावरुन जाणारी लोकल रवाना झाली. ती पुढे जाऊन सँडहर्स्ट रोड स्थानकात थांबली. सँडहर्स्ट रोड स्थानकातून लोकल पुढे निघाल्यावर मोटरमनला रुळांवर काहीतरी दिसलं. संशयास्पद वाटल्यानं मोटरमननं अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. मोटरमन स्वतः लोकलमधून उतरुन त्या वस्तूजवळ गेले. तर तो मोठा ड्रम होता. आणि त्या ड्रममध्ये तब्बल १५ ते २० किलोंचे दगड भरुन ठेवलेले होते. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. सँडहर्स्टहा रोड (Sandhurst Road) -भायखळा (Byculla) स्थानकादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. मात्र प्रसंगावधान दाखवत मोटरमन अशोक शर्मा यांनी अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. अशोक शर्मा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. अशोक शर्मा यांच्या कृत्याचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जात आहे.

मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण डाव उधळला गेला आहे. समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

शहाजी बापू पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे युवासेना झाली आक्रमक

आज नासाकडून होणार नवीन चंद्रयान लाँच

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss