spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा एक नवा धक्का!

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. बंड करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या एकनाथ शिंदेंनी आणखी धक्के देणं सुरूच ठेवलं आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. बंड करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या एकनाथ शिंदेंनी आणखी धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. नुकताच त्यांनी एक धक्का दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक नवा धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Sarkar) काळात राज्यपाल (Governor Bhagatsingh Koshyari) नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर आता नवी नावं आपण देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. १२ नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकारनं १२ नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारनं दिलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी १२ जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचं नाव होतं तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचं नाव देण्यात आलं होतं. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत.

शिंदे गटातील संभाव्य नावे –
रामदास कदम
विजय शिवतारे
आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ
अर्जुन खोतकर/ नरेश मस्के
चंद्रकांत रघुवंशी
राजेश क्षीरसागर

भाजप गटातील संभाव्य नावे – 
हर्षवर्धन पाटील
चित्रा वाघ
पंकजा मुंडे
कृपाशंकर सिंग
गणेश हाके
सुधाकर भालेराव

हे ही वाचा :

मुंबई लोकलवरील मोठा अनर्थ टळला

आज नासाकडून होणार नवीन चंद्रयान लाँच

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss