spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसे भाजपमध्ये युती होणार का? राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांची दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेट घेतली. मात्र त्यांच्या भेटीनंतर महायुती संदर्भातील कोणताही निर्णय अजून घेण्यात आला नाही . राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीमधून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीकडे रवाना होणार आहेत. सोमवारी राज ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत. त्यामुळे आता भाजप मनसे युती होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

महायुतीच्या जागावाटपा संदर्भात सगळीकडे चर्चा सुरु आहेत. दिल्लीमध्ये सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दिल्लीमध्ये आज राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर त्यांची ही भेट महत्वाची ठरणार आहे. याआधी अनेकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठका झाल्या आहेत. त्यामुळे मनसे भाजप महायुती होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

प्रकाश पोहरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, बंद दाराआड अर्धा तास चर्चा

स्वत:चा संस्कृतपणा बघा, मग मुख्यमंत्र्यांना बोला; शिवसेना प्रवक्ते आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss