spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनंतचतुर्दशीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय

गणरायांच्या उत्सवमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी अनेक प्रवासी रात्री उशिरा प्रवास करतात.

गणेशोत्सव (Ganeshotsav) सध्या देशभरात उत्साहात सुरू आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा, मध्य प्रदेशामध्ये साजरा केला जातो. या उत्सवात बरेच लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून 10 दिवस तिची मनोभावे पूजा करतात. महाराष्ट्रात तर दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणार्‍या या उत्सवात संपूर्ण विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून भव्य देखावे उभारले जातात. विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, मागील सलग दोन वर्षं कोरोना महामारीमुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला.

पण, यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दीड, पाच, सात, अकरा अशा विविध दिवसांच्या कालावधीसाठी गणपतीची स्थापना केली जाते पण, अनंतचतुर्दशीच्या वेळी मुंबई मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे अनंतरचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान 9 आणि 10 सप्टेंबरच्या मध्यरात्री चार जादा स्पेशल लोकल ट्रेन (extra special local trains) सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. रेल्वे विभागाने याबाबत घोषणा केली असून, या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रकही जारी केलं आहे.

31 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव 9 सप्टेंबरला म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पांच्या उत्सवमूर्तीचं विसर्जन होऊन संपेल. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस असून, या दिवशी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेतल्यास, मुंबईत 34 हजार गणेशमूर्तींचं विसर्जन झालं होतं. गणरायांच्या उत्सवमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी अनेक प्रवासी रात्री उशिरा प्रवास करतात.

हे ही वाचा:

कपिल शर्मा, दीपिका पदुकोण, रोहित शर्मासह इतर क्षेत्रातील दिग्गज करणार मेगा ब्लॉकबस्टरसाठी कोलॅब

ब्रिटनला मागे टाकत, भारतीय अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss