spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुढचे काही दिवस पुणे तापणार; उष्णतावाढीबद्दल हवामान विभागाने केला अंदाज व्यक्त

4 सप्टेंबरपर्यंत शहरातील दिवसाचे तापमान (Temperature) 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे

ऐन गणेशोत्सवात राज्यातील तापमानात बरीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्यातच पुण्यात तापमान वाढ होण्याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी दिवसभरात पुणे शहर परिसरात 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यावरुन हवामान खात्याने आता शहरातील दिवसाचे तापमान उच्च पातळीवर राहणार, अशी शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 5.1 अंश सेल्सिअस अधिक होते. तर रात्रीचे 22.4 अंश सेल्सिअस तापमान हे सामान्यापेक्षा 1.3 अंश सेल्सिअस जास्त होते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 4 सप्टेंबरपर्यंत शहरातील दिवसाचे तापमान (Temperature) 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील काही दिवसांत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत शहरातील दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. तर दुपारपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहील, असे सांगत या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शहरात हलका पाऊस पडेल, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

5 सप्टेंबरपासून मराठवाडा आणि विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. मान्सून समुद्रसपाटीपासून त्याच्या सामान्य स्थितीच्या उत्तरेकडे जातो. लक्षद्वीप क्षेत्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर चक्रीवादळ परिवलन आहे, असे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दुपारी 1.15 मिनिटांनी घेतलेल्या उपग्रह छायाचित्रावरून असे दिसते कि राज्यात रायगडपासून गोवा, कर्नाटक आणि केरळपर्यंतच्या घाट क्षेत्रांवर मेघगर्जनेचे ढग दाटून आलेले आहेत. रायगडपासून मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळच्या काही भागांतही हीच स्थिती राहणार आहे, अशी माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मायदेशी परतले, सरकारकडून विशेष सुरक्षा, बंगला

अनंतचतुर्दशीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss