spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मिर्झापूर’ चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल (Ali Fazal) यांची प्रमुख भूमिका असलेली वेब सिरीज 'मिर्झापूर'ला (Mirzapur) प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल (Ali Fazal) यांची प्रमुख भूमिका असलेली वेब सिरीज ‘मिर्झापूर’ला (Mirzapur) प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मिर्झापूरच्या दोन्ही सिझननंतर आता तिसऱ्या सिझनची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझन ची (Mirzapur 3) झलक समोर आली होती. त्यामुळे आता सिरीज कधी रिलीज होणार? याच्याकडे सगळ्यांचा लक्ष आहे.

मिर्झापूरचा पहिला सिझन २०१८ मध्ये आला होता. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स अश्या वेब सिरीज ला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. प्रेक्षकांच्या मागणी नंतर याचा दुसरा सिझन २०२० मध्ये आला होता. आता या २ सिझन नंतर तिसऱ्या सिझनची चाहते वाट पाहत आहेत. वेब सीरिजचे निर्माते रितेश सिधवानी यांनी तिसरा सिझन आणण्यासाठी ४ वर्ष घेतली आहेत. आता ‘मिर्झापूर 3’ २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मिर्झापूर -3’ ही वेब सीरिज जून-जुलै दरम्यान रिलीज होऊ शकते. किंवा ती या वर्षाच्या शेवटी पण रिलीज होण्याची शक्यता आहे.

‘मिर्झापूर’मध्ये तगडी स्टारकास्ट होती. या वेब सीरिजमध्ये कुलभूषण खरबंदा, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, दिवेंद्रू शर्मा, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, शीबा चड्ढा, हर्षिता गौर, श्रिया पिळगावकर इत्यादी कलाकार होते. त्यानंतर २ सिझन मध्ये अभिनेता विजय वर्माची आणि लिलीपुट यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे आता ३ सिझन मध्ये कोणकोण नवीन कलाकार असणार याकडे सगळ्यांचा लक्ष आहे. आणि आता या सिझन मध्ये काय नवीन बगायला भेटणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांना आवडेल अशी हेल्दी टेस्टी पालक आणि बीटरूट पुरी

अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार, दानवेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss