spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वंचितकडून लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections 2024) वारे आता देशभरात वाहू लागले आहेत. देशात सत्ताधारी आणि त्यांचे मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षातील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाटाघाटी सुरु आहेत. अश्यातच. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) (VBA) आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी, (१ एप्रिल) जाहीर केली. यावेळी “वंचित” कडून या दुसर्या यादीत एकूण ११ उमेदवारांना लोकसभा उमेदवारीचे तिकीट देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीकडून या दुसर्या यादीतही समाजातील विविध घटकातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी, वंचित बाहुजण आघाडीकडून २७ मार्च रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये, एकूण ८ उमेदवारांना लोकसभा उमेदवारीचे तिकीट पक्षाकडून देण्यात आले होते.

वंचित कडून जाहीर करण्यात आलेली उमेदवारांची यादी

  • हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण
  • लातूर – नरसिंहराव उदगीरकर
  • सोलापूर – राहुल गायकवाड
  • माढा – रमेश बारसकर
  • सातारा – मारुती जानकर
  • धुळे – अब्दुल रहमान
  • हातकणंगले – दादासाहेब चवगौंडा पाटील
  • रावेर – संजय पंडित ब्राह्मणे
  • जालना – प्रभाकर बकले
  • मुंबई उत्तर मध्य – अबूल हसन खान
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी

 

प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीवर भाष्य

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी, (३१ मार्च) पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले. ते म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले असून आम्ही त्यांना ७ जागांवर पाठिंबा देत आहोत. यापैकी कोल्हापूर आणि नागपूर मतदारसंघात आम्ही त्यांना पाठिंबा देत असून उरलेल्या जागांची त्यांच्याकडून यादी येईल त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. “

हे ही वाचा:

मोदी म्हणजे गुजरातचे जॉनी लिव्हर, संजय राऊतांची टीका

Kejriwal यांना कोर्टाचा दणका, सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss