spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Loksabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे २१ उमेदवार जाहीर

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाकडून आज (बुधवार, ३ एप्रिल) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत चार उमेदवारांना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी, २८ मार्च रोजी ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, आतापर्यंत ठाकरे गटाकडून २१ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी लोकसभा निवडणुकांसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना तर पालघर मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, नुकत्याच भाजपमधून पक्षप्रवेश केलेल्या करण पवार यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी, ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत चार उमेदवारांची नावे जाहीर केल्याने एकूण २१ उमेदवार निश्चित झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे एकूण उमेदवार

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ – वाशीम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे पाटील
  • सांगली – चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  • नाशिक – राजाभाई वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग – रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  • कल्याण – वैशाली दरेकर
  • हातकणंगले – सत्यजित पाटील
  • जळगाव – करण पवार
  • पालघर – भारती कामडी

हे ही वाचा:

Pune Loksabha Election: Vasant More यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश, पुण्यातून लढणार लोकसभा निवडणूक

CM Eknath Shinde यांना त्रास होऊ नये म्हणून माघार, मात्र जागेवर दावा कायम :Uday Samant; रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेवरून तिढा कायम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss