spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IIT MUMBAI भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध – Droupadi Murmu

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती बोलत होत्या. भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

सीएआर- टी सेल थेरपी ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगती मानली जात असल्याचे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, सीएआर-टी पेशीवर आधारीत उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीच्या बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार पद्धती ही जगातील सर्वात परवडण्याजोगी असल्याचे समजून त्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहकार्यासह आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, तंत्रज्ञान शिक्षणाचे मॉडेल म्हणून आयआयटी मुंबई केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सीएआर-टी पेशी उपचार पद्धती विकसित करण्यामध्ये संस्थेसोबत उद्योगाशीही भागीदारी केली जात आहे. आयआयटी मुंबईने गेल्या तीन दशकांमध्ये संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आयआयटी मुंबई इतर तत्सम संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये संपूर्ण भारताला सध्या सुरू असलेल्या तांत्रिक क्रांतीमध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.

हे ही वाचा:

साताऱ्यातून कोणाला मिळणार उमेदवारी? सिल्वर ओकवर Sharad Pawar यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक

हिंगोलीत महायुतीने उमेदवार बदलला, Hemant Patil ऐवजी Baburav Kadam Kohalikar यांना उमेदवारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss