spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महानगरपालिकेच्या धोरणामुळे शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?

राज्य सरकारने ठरवून दिलेले धोरणच शिंदे गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकते.

गेल्या कितीतरी दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात दसऱ्या मेळाव्यावरुन चान्गलाच वाद रंगलाय. दोन्ही पक्षांकडून दसरा मेळावा शिवतीर्थवर करता यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. अशातच दसरा मेळाव्याची तयारी सुरु करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर दसरा मेळावा घेता यावा म्हणून महानगरपालिकेत अर्ज सादर केला आहे. तर दुसरीकडे आता शिंदे गटानेही शिवतीर्थसाठी महानगरपालिकेत आपला अर्ज दिला आहे. पण, मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच आवाज घुमणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

परंपरेनुसार, शिवसेना दरवर्षी शिवतीर्थवर दसरा मेळावा घेत आलीय. पण शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्याची हालचाल सुरु केल्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अटीतटीचा सामना सुरु झालाआहे. राज्य सरकारने ठरवून दिलेले धोरणच शिंदे गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकते. शिवतीर्थावर मेळावा किंवा सभा घेण्याची परवानगी देण्याबाबत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य परवानगी देण्याचं पालिकेचं धोरण आहे. त्यानुसार, शिवसेनेनं 15 दिवसांपूर्वीच मुंबई पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. सेनेच्या अर्जानंतर 15 दिवसांनी शिंदे गटानेही अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेनेनं पहिला अर्ज केल्यामुळे पालिका शिवसेनेला परवानगी देण्याची शक्यता आहे.

महत्वाची बाब म्हणजे शिवतीर्थ हा मुंबई उच्च न्यायालयााने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, वर्षातून 45 दिवसच शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी आहे. या 45 दिवसांपैकी 9 सभा घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे. तर उर्वरीत 36 अधिकार हे मुंबई पालिका देत असते. राज्य सरकारकडे ज्या 9 परवानगी देण्याचे अधिकार आहे, त्यामुळे दसरा मेळावा येत नाही. त्यामुळे दसरा मेळाव्याला परवानगी देण्याचा अधिकार हा मुंबई पालिकेला आहे. या निर्णयामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त काही कारणासाठी सूचना करू शकते. त्यामुळे आता शिवतीर्थवर दसरा मेळावा नक्की कोण घेणार? शिवसेना कि शिंदेगट? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

फुलकोबी जास्त प्रमाणात खाल्याने होतील शरीरावर परिणाम

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss