3 सप्टेंबर पासून जवळपास 5 वर्षांनंतर ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhhla Jaa) चा नवा सीजन सुरु झाला आहे. शोमधील कलाकार पाहता प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच माधुरी दीक्षितसोबत करण जोहर आणि नोरा फतेही या सीजन 10 चे परीक्षक आहे. आज आपण या सेलिब्रेटी स्पर्धकांच्या मानधनाबाबत जाणून घेणार आहोत.
एका वृत्तानुसार, ‘अनुपमा’ फेम पारस कलनावत या शोच्या एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेत आहे.
‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेता अली असगर शोच्या एका एपिसोडसाठी तब्बल 2 लाख रुपये घेणार आहे
कुंडली भाग्य फेम अभिनेता धीरज धुपर एका एपिसोडसाठी 2.5 लाख रुपये घेत आहे.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये मानधन घेत आहे.
तर नीती टेलर एका एपिसोडसाठी जवळपास 1.5 लाख रुपये घेत आहे.
बोल्ड अभिनेत्री म्ह्णून ओळख असणारी निया शर्मा एका एपिसोडसाठी 2.5 लाख रुपये घेत आहे
भाबीजी घर पर है मधील अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेत असल्याचं म्हटलं जात आहे.
रुबिना दिलैक एका एपिसोडसाठी तब्बल 7 लाख रुपये घेत आहे.
टिकटॉक स्टार फैजल शेखने सर्वात जास्त मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, फैजल एका एपिसोडसाठी तब्बल 10 ते 11 लाख रुपये घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत होणार महत्त्वाचे बदल
‘सीएसके’ चा कॅप्टन धोनी राहणार की जाणार? सीएसकेने घेतला मोठा निर्णय
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.