spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटातील २० आमदार अजूनही आमच्यासोबत; अनिल देसाईंचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा अनिल देसाई यांनी केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड फसणार की काय अशी एकच चर्चा सगळीकडे रंगली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक आठवडा उलटून गेला आहे. शिवसेनेत बंड करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणारे एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणाचे समीकरणच बदलून टाकले. सत्ता संघर्षाची ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. सर्वोच न्यायालायने शिंदे गटाला सध्या दिलासा दिला आहे. तसेच येत्या १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई केली जाऊ नये असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी याना नोटीस पाठवली आहे. त्यांना पाच दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी येत्या ११ जुलै ला होणार आहे. सर्व घडामोडी घडत असताना आता शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्या एका वक्तव्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड फार काळ टिकू शकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे नेते एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसोबत गुवाहाटीत हॉटेल मध्ये वास्तव्यास असल्याच्या चर्चा असताना शिवसेना नेते अनिल देसाई यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड फसणार की काय अशी एकच चर्चा सगळीकडे रंगली आहे. गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये शिवसेनेचे तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचं शिन्देगताकडून वारंवार सांगण्यात येत असलं तरी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केवळ ३८ आमदारांचा उल्लेखच करण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित २ आमदार हे थेट अजूनही शिवसेनेच्या संपर्कात आहेत का याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई मागे घेतलेली नसल्याने सर्व बंडखोर आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याचा थेट निकाल येत्या ११ जुलैला होणार आहे.

याबाबत पुढे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांचं म्हणणं आहे, आम्ही मुंबईत किंवा विधानसभेत मतदानाला आल्यास शिवसेनेचे समर्थन करू. त्यामुळे देसाई यांचे वक्तव्य खरे ठरले तर येत्या दिवसात एकनाथ शिंदे यांचे बंड पूर्णपणे फसण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss