spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 5 September 2022 – जवळच्या मंडळींचे सहकार्य…

मेष  : आपण केलेली अथक मेहनत इष्ट परिणाम देईल. व्यावसायिक जगतात प्रतिष्ठा वाढेल. जवळच्या मंडळींचे सहकार्य लाभेल,

मेष  :
आपण केलेली अथक मेहनत इष्ट परिणाम देईल. व्यावसायिक जगतात प्रतिष्ठा वाढेल. जवळच्या मंडळींचे सहकार्य लाभेल, जीवनाला कलाटणी मिळणारा काळ आहे. निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. ईश्वरीय शक्तीची अनुभूती येईल .

वृषभ :
आर्थिक स्थितीचा आलेख सुधारेल. जुने येणे वसूल होईल. व्यापार उद्योगात अधिकची गुंतवणूक कराल. तुमच्यासाठी सामाजिक स्थिती अनुकूल राहील. कर्तव्याचा बोजा वाढू शकतो. भाग्यातील गोष्टी मिळतील. तळपायाची आग होणे, किंवा तत्सम विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्या.

मिथुन :
अनेक दिवसापासून आपण घेत असलेल्या मेहनतीला यश प्राप्त होण्यासारखा आजचा दिवस आहे. मात्र त्यासाठी आपण आपल्या विचारातही सकारात्मकता ठेवण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात आनंद देणारी घटना घडेल. तुम्ही कल्पनेत रंगवलेलं चित्र प्रत्यक्षात साकार होऊ शकेल. पोटा संबंधीचे विकार असतील तर योग्यवेळी वैद्यकीय उपचार करून घ्यावेत.

कर्क :
वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यवसायिक चर्चेच्या माध्यमातून अनेक मार्ग दृष्टीक्षेपात येतील. तरीही अंतिम निर्णयासाठी थोडा अवधी द्यावा लागेल. भाग्य उदयासाठी आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करणारे मंडळी भेटतील. पाणी बदलाने होणारे साथीचे विकार उदभवू शकतात.

सिंह :
तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याचे निर्णय घ्याल. परदेशस्थ व्यवहार सुरळीत होण्यासाठी हा काळ अत्यंत सुलभ आहे. न्यायालयीन कामकाजात यश संपादन कराल. आपणास सहयोगी मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळेल. गुडघेदुखी किंवा कमरेपासून खालचा तो पायाचा भाग त्याठिकाणी पिडा होऊ होऊ शकते.

कन्या :
वडिलोपार्जित स्थावर इस्टेट विषयक प्रश्न मार्गी लागण्यासाठी आजचा दिवस अत्यन्त शुभ आहे. लॉटरी सारख्या व्यवसायामध्ये लाभ होऊ शकतो. भागीदाराकडून सहकार्याची भूमिका घेतली जाईल . विवाह इच्छुकांच्या विवाह ठरतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कलाकारणांसाठी आजचा दिवस पर्वणीचा असेल.

तुळ :
आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आजच्या घडामोडी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील. दुर्जनांच्या संगतीने आपण कायद्याच्या कचाटीत सापडले जाऊ शकता. जुने शरीर विकार असतील तर ते त्रासदायक ठरू शकतील. अशा विकारावर योग्यवेळी उपचार करणे आवश्‍यक आहे. कुटुंबातील मंडळींकडून उचित असेच सहकार्य मिळेल.

वृश्चिक :
वाहन खरेदीसाठी आता सध्या अनुकूल स्थिती नाही. आज आपणास घरगुती व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील तसेच आपण घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. विद्यार्थी दशेतील मुलांना नवीन शिक्षण पद्धती सहज आणि सुलभ होईल. दैवी उपासना केल्याने आत्मिक समाधान लाभेल.

धनु : 
अनारोग्य वाढू देऊ नका. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. उच्चपदस्थ व्यक्तींना सन्मानाने तसेच आत्मीयतेने वागणूक मिळेल. आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पारितोषक मिळू शकेल. आपण केलेल्या कार्याची स्तुती होईल. प्रतिस्पर्धी व्यक्तीवर आपण सहज मात कराल.

मकर :
धनाचा संचय उत्तमप्रकारे करू शकाल. नेत्र विकारांनी त्रस्त व्हाल. व्यापार उद्योगात धावपळ वाढेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. अचानक निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी. दोषारोपाने विचलित होऊ शकाल. सारांश संमिश्र वातावरण राहील.

कुंभ :
नवीन योजनांची आखणी कराल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयोगी पडेल . शिक्षणाला योग्य न्याय मिळेल. नोकरीमध्ये उन्नती कराल. अचानक खर्च उदभवू शकतात. न्यायालयीन कामकाज सकारात्मक निर्णयाकडे जाईल. ठोस निर्णय घेतल्याने व्यावसायिक निव पक्की होईल. मनाला आनंद मिळेल.

मीन :
इमारत निर्माण व्यवसायासाठी नवीन संधी चालून येतील. कौटूंबिक जीवनात रमाल. घर खरेदीसाठी उत्तम काळ आहे. त्यासंबंधी व्यावहारिक चर्चा केल्यास उत्तम प्रतिसाद देखील मिळू शकेल. भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. हितशत्रूंच्या कारवाया व्यतीत करतील.

Latest Posts

Don't Miss