spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्लॉकबस्टर ‘चंद्रमुखी’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; चंद्राच्या अदांनी प्रेक्षक पुन्हा होणार घायाळ

'चंद्रमुखी' सिनेमाचा 25 सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.

आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी चंद्र्मुखी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेल्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) सिनेमाचा 25 सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. चंद्रमुखीच्या प्रीमियर पासून अगदी तो सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांनी चंद्रमुखीला खूप प्रेम दिले आहे. आणि या सिनेमातील चंद्रा हे गाणं तर जणू सोशल मीडियावरचा ट्रेंड बनलं होत.

‘चंद्रमुखी’ हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखी’ सिनेमात दाखवण्यात आली आहे. अमृता खानविलकरने या सिनेमात चंद्राची भूमिका साकारली आहे. तर खासदार दौलतराव देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसून येणार आहे. तर ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या प्रसाद ओकने ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चर या वाहिनीवर दुपारी एक वाजता पाहायला मिळणार आहे.

 ‘चंद्रमुखी’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.21 कोटींची कमाई केली होती. जागतिक पातळीवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘चंद्रमुखी’ सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे.

हे ही वाचा:

भारतीय वंशाच्या ऋषी सुनकचा पराभव करत लिझ ट्रस बनल्या यूकेच्या नव्या पंतप्रधान

स्वस्त दरात लवकरच उपलब्ध होणार जिओ 5G फोन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss