spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

टाटा उद्योग (Tata Sons) समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं पालघरमध्ये (Palghar) अपघाती निधन झाले.

टाटा उद्योग (Tata Sons) समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं पालघरमध्ये (Palghar) अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

वयाच्या ५४ वर्षी टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परवा (रविवारी) दुपारी ३. १५ च्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारमध्ये ४ लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. महिला कार चालवत होती, सध्या ती जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे रूग्णालयात आणण्यात आले होतं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचं पार्थिव शनिवारी रात्री मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम रात्री अडीच वाजता पार पडलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात आलं. सायरस मिस्त्री यांचे भाऊ आणि मुलं काल रात्री मुंबईत आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले आहेत. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना पालघरच्या चारोटीजवळ मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अतिवेगानं गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं केला आहे. दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे.

हे ही वाचा:

भारतीय वंशाच्या ऋषी सुनकचा पराभव करत लिझ ट्रस बनल्या यूकेच्या नव्या पंतप्रधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते ए.एम.नाईक शाळेचा उदघाटन सोहळा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss