spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही दुधाचा चहा व कॉफी पिताय ? तर आजच बंद करा..

सकाळी चहा ऐवजी दुधाचा चहा न पिता कोऱ्या चहा(Black tea) चे सेवन करु शकता.पण दुधाचा चहा पिण्याची सवय असेल तर ती आताच बंद करा... नियमित दुधाचा चहा घेतल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतो. हे पाहुयात..

आपल्या भारतीय लोकांमध्ये “चहा” हे अतिशय आवडते पेय आहे. जोपर्यंत सकाळी एक कप चहा पित नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात होत नाही.नाश्तामध्ये चहा नसला की संपूर्ण दिवस उत्साही राहणार नाही असा काहींचा गैरसमज आहे.परंतु, चहा व कॉफी च्या नियमित सेवनाने आपल्या शरीरावर त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात याची कल्पनाच न केलेलीच बरी..सकाळी चहा ऐवजी दुधाचा चहा न पिता कोऱ्या चहा(Black tea) चे सेवन करु शकता.पण दुधाचा चहा पिण्याची सवय असेल तर ती आताच बंद करा… नियमित दुधाचा चहा घेतल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतो. हे पाहुयात..

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाचा चहा व कॉफी यांमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असल्याकारणामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे अशक्तपणा येतो. तसेच चहा किंवा कॉफी चे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची पातळी वाढू शकते. त्यामुळे हृदयाशी संबंधित असलेल्या समस्या उद्भवू शकतात. तसेच रिकाम्या पोटी चहा व कॉफी चे सेवन केल्याने डोकेदुखी, पित्त ,निद्रानाश अशा अनेक शरीरविषयक समस्यांना सामोरे जावे लागते.

एक कप चहा मध्ये ३० ते ६५ मिलिग्रॅम कॅफिन तर १ कप कॉफी मध्ये ८० ते १२० मिलिग्रॅम कॅफिन असल्याचे सिद्ध झाले आहे. संपूर्ण दिवसभरात कॅफिनचे ३०० मिलिग्रॅम पेक्षा जास्त सेवन केल्याने ते आपल्या आरोग्यास घातक ठरू शकते असेही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी दिलेल्या संशोधनानुसार सांगण्यात आले आहे.

जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवायचे असेल तर,दुधाच्या चहा-कॉफी ऐवजी बिन दुधाचा (Black Tea or coffee) चहा घेण्यास प्राधान्य द्यावे असे त्यामुळे तुमचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल.जर तुम्हाला चहा ऐवजी काही वेगळं खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही फळांचा आहार देखील करु शकता. पण दुधाच्या चहाने होणाऱ्या दुष्परिणामाने आपले आरोग्य धोक्यात घालू नका असा ही सल्ला देण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss