spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 6 September 2022 – आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता…

तुम्ही स्वीकारलेल्या कामाच्या सफलतेमुळे आत्मिक समाधान लाभेल. तुमच्या कला कौशल्याची जनमानसात स्तुती होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.

मेष : तुम्ही स्वीकारलेल्या कामाच्या सफलतेमुळे आत्मिक समाधान लाभेल. तुमच्या कला कौशल्याची जनमानसात स्तुती होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. कर्तबगारी दाखवी लागेल. जमीन खरेदी करण्यासाठी संधी उपलब्ध होतील. वाणिज्य विषयाचा अभ्यास वाढवावा.

वृषभ : आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कोणाला मदत अथवा उसनवारी करणे टाळावे. नोकरदारांना आनंद देणारी बातमी ऐकायला मिळेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होतील. नेहमी पेक्षा अधिक शारीरिक परिश्रम करावे लागतील. स्त्रियांसाठी : घर गृहस्थी उत्तम राहील.

मिथुन : गेल्या अनेक दिवसापासून अडकून पडलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल. विनाकारण केले गेलेल्या आरोपामुळे मानसिक संतुलन बिघडले जाण्याची शक्यता आहे. अनाठायी होणार खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. भावन्डाच्या भेटीगाठी होतील.

कर्क : आपण करीत असलेल्या व्यवसायास स्थैर्य लाभेल. तसेच अनेक नवीन संधी देखील चालून येतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतील. अकारण भय उत्पन्न होईल. दैवी उपासना करणे हिताचे ठरेल. स्त्रियांनी स्त्रीविकारांकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेणे हिताचे ठरेल. सरकार दरबारी कार्यरत अधिकारी किंवा नोकरदारास राज दरबारातून भय उत्पन्न होईल. कोणतीही जबाबदारी घेताना ती पेलवेल कि नाही याचा विचार करूनच ती घ्यावी . तुम्ही करीत असलेल्या मेहनतीला न्याय मिळेल. परदेश गमनासाठी उत्तम काळ आहे.

कन्या : आज थोडीशी शारीरिक कमजोरी जाणवेल. वातावरण बदलल्याने विकार त्रासदायक ठरतील. राजकारणात अपेक्षित यश मिळणार नाही. भीतीचे वातावरण बनून राहील. तुमचे साथीदार देखील विश्वास घात करू शकतात. कर्जाची मागणी केली असल्यास तुमच्या कामात यश प्राप्त होईल.

तुळ : विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल. भागीदारीत फायदा होईल. नवीन मित्र भेटतील. राजदरबारी सन्मान मिळेल. स्त्रियांसाठी पीडादायक काळ आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आत्मिक समाधान लाभेल. तुमच्या कलाकौशल्याला न्याय मिळेल.

वृश्चिक : निसर्गरम्य स्थळाला भेट द्याल. तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या घटना घडतील. व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. मंगल कार्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. भागीदारीतून फायदा होईल. जवळचे प्रवास घडून येतील. सन्मान प्राप्त होतील. आशादायक वातावरण तयार होईल. स्त्रियांना सुखाची गुरुकिल्ली मिळेल.

धनु : विद्यार्थ्यांना अभ्यासात योग्य दिशा मिळेल. इच्छूकांचे संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. आपण हाती घेतलेल्या कामांना गती मिळण्यासाठी अधिक परिश्रमांची आवश्यकता आहे. व्यवसायास अनुकूल स्थिती आहे. मंगल कार्य ठरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. बौद्धिक पातळीवर निर्णय घेताना विचलित पण जाणवेल मात्र अशावेळी थोरांचा सल्ला उपयोगी पडेल.

मकर : कुणावरही अतिविश्वास टाकणे धोकादायक ठरू शकेल. घर खरेदी सारखे निर्णय थोडे लांबणीवर टाकावेत . मित्र परिवाराकडून सहाय्य मिळेल. अगदी सहजपणे आर्थिक तरतूद करू शकाल. दूरगामी परिणामांचा विचार करून आजचा निर्णय निश्चित करावा. कौटुंबिक सुखाची प्राप्ती होईल.

कुंभ : या राशीच्या मंडळींना आनंददायी घटनांचा काळ आहे. आपण अनेक मोठे निर्णय घेऊ शकाल. शरीर विकार त्रासदायक ठरतील. प्रचलित कामाची स्थिती जैसे थे राहील. नवीन विषयाचा अभ्यास अथवा प्रशिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. अचानक धनलाभ होतील. जवळपासच्या प्रवासाचे योग आहेत.

मीन : मित्र – परिवाराशी मिळते जुळते घ्यावे लागेल. नेत्र विकार उदभवू शकतील. राजदरबारी मानसन्मान वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. नवीन कामाला सुरुवात करताना थोडे सबुरीने घ्यावे. सामाजिक विषयात परिवर्तन दिसून येईल. शब्द प्रयोग तोलून मोलून अथवा सांभाळूनच करावा.

Latest Posts

Don't Miss