spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“पंचायत सिझन-३” अखेर कोण जिंकणार निवडणूक ?

.पंचायत सिझन-१ आणि पंचायत सिझन-२ ला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जितेंद्र कुमार, चंदन रॉय,फैजल मलिक आणि नीना गुप्ता या कलाकारांवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव झाला.

एका बाजूला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात देखील निवडणुकीचं सत्र सुरु झालं आहे.अॅमेझॉन प्राईम वरील सुप्रसिद्ध “पंचायत सिझन- १” ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीत पडली होती.पंचायत सिझन-१ आणि पंचायत सिझन-२ ला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जितेंद्र कुमार, चंदन रॉय,फैजल मलिक आणि नीना गुप्ता या कलाकारांवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या प्रतिसादामुळेच “पंचायत सीझन -३” ही वेब सिरीज २८ मे २०२४ रोजी अॅमेझॉन प्राईम वर प्रदर्शित होणार आहे.

२०२० मध्ये “पंचायत”चा पहिला सीझन आला. ज्यामध्ये एक कॉर्पोरेट मुलगा ग्राम सचिव बनतो. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की , जो कधीच खेडे गावात राहिला नाही त्याला ‘फुलेरा’ सारख्या गावात येऊन राहावे लागते. त्याचं आयुष्य कसं अशांत होऊन जातं हे दाखवण्यात आलं आहे. तो बऱ्याच वेळा नोकरी सोडण्याचा प्रयत्न करतो पण तो नेहमी अपयशी ठरतो. हळूहळू तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. २०२२ मध्ये दुसऱ्या सीझनच्या शेवटी सचिवांच्या बदलीसाठी वातावरण तयार झाले होते.यापुढे काय होणार? तिसरा सिझन कधी येणार? याची उत्सुकता सर्वांना होती.१५ मे ला या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सर्वत्र चर्चा सुरु झाली.

पंचायत सीझन 3 चा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, त्याची कथा मागील दोन सीझनपेक्षा खूपच वेगळी आहे. विशेष म्हणजे सर्व पात्रं जुनी आहेत. त्यामुळे हा सीझन मजेशीर दिसणार आहे. सोशल मीडियावरही त्याचे खूप कौतुक होत आहे. फुलेराच्या प्रमुख मंजू देवी यांनी सचिवाची बदली थांबवली. सचिवही परत येतो आणि त्याचा अभ्यास सुरू करतो पण त्याच दरम्यान बनारकस आपली हालचाल करतो. रस्त्याच्या बांधकामाबाबत तो गावात गदारोळ माजवतो,यावरून बरेच वाद होतात. या वादात ‘बिनोद देख रहा है’ ची स्टाइल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. “बनारकस” निवडणूक लढवायला उभे राहतील आणि हे सर्व पाहण्यास मजेदार असेल.यंदाची निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा:

सुनील छेत्रीचा फुटबॉलपासून संन्यास, ६ जूनला खेळणार शेवटची मॅच

Katrina Kaif Birthday Special ; काही खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss